यामुळे फर्नांडिसांनी ३ दिवस रेल्वे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला नव्हता 

नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस यांच्या कणखर बाण्याचे अनेक किस्से भारतीय राजकारणामध्ये अजरामर आहेत. फर्नांडिस यांच्याबाबतचा असाच एक अमर किस्सा त्यांची रेल्वेमंत्री पदी निवड करण्यात आल्यानंतरच आहे. १९८९ मध्ये वी. पी. सिंघ यांच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची धुरा सुपूर्द करण्यात आली होती. रेल्वेमंत्रीपदी निवड झाल्याने फर्नांडिस त्यावेळी चांगलेच पेचात पडले होते. संभ्रमामध्ये सापडलेल्या जॉर्ज यांनी त्यावेळी तब्ब्ल तीन दिवस रेल्वे भवनामध्ये जाण्याचे टाळून मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार दर्शवला होता.

फर्नांडिस यांचं असं वागण्याचं कारण त्यांच्या निकटवर्तीय सहकारी जया जेटली यांच्या “लाईफ अमंग द स्कॉर्पियन्स’ या २०१७ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलं आहे. या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की, १९७४ साली आशियातील सर्वात मोठ्या रेल्वे संपाचे नेतृत्व फर्नांडिस यांनी केलं होतं. यावेळी त्यांचे संबंध रेल्वे कामगार संघटनांच्या अनेक नेत्यांशी आले होते. ज्यांच्यासोबत आपण आंदोलनामध्ये सामील झालो त्यांच्याबरोबरच वाटाघाटी करायला कस बसायचं? असा पेच त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. त्यांनी जेव्हा कार्यभार स्वीकारण्यासाठी मंत्रालय गाठलं तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाकडून त्यांना अडविण्यात देखील आले होते. असे अनेक किस्से या पुस्तकामध्ये सांगण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)