मुंबई : एकनाथ शिंदे हे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या चर्चाना वेग आला होता. मात्र आता एकनाथ शिंदे गटाने आम्ही शिवसेनेचेच आहोत मात्र मुख्यमंत्र्यांसोबत जायला ते तयार नाही असे सांगितले. अशात एकनाथ शिंदे मनसे सोबत जाऊन सत्ता स्थापण करू शकतात का ? अशी देखील चर्चा आहे . कारण एकनाथ शिंदे यांनी मागच्या तीन दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मनसे सोबत जाण्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की ,”ते MIM मध्ये जाऊ शकतात, समाजवादी पक्षासोबाबत जाऊ शकतात. त्यांना त्यांच्या आमदारक्या वाचवायचा असतील तर ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला. त्यांचा पाळणा हालावला त्यांचा द्वेष करून ते दुसऱ्या पक्षात जाणार असतील तर महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शिवाय मनसे बाबत प्रतिक्रिया देताना , ‘मनसेला अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल’, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.