मालमत्ता खरेदी करताना (भाग-१)

घर खरेदी करताना करण्यात येणारा करार हा महत्त्वाचा असतो. या करारावर सह्या करण्यापूर्वी त्यातील तरतूदी काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणे गरजेचे आहे.

कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्या विकासकाची पार्श्‍वभूमी आणि त्याच्या कामाची पद्धत जाणून घ्या. एखादी घरकुल योजना अत्यंत प्राथमिक अवस्थेत असेल तर अशावेळी त्या विकसकाची आर्थिक स्थिती जाणून घ्या. एखादा गृहप्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याची आणि घराचा ताबा वेळेत मिळण्याची लेखी हमी मिळत असेल तरच त्या ठिकाणी गुंतवणूक करावी. काहीवेळा 60 ते 80 टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पात गुंतवणूक करणे हिताचे ठरते.

मालमत्ता खरेदी करताना (भाग-२)

जर एखाद्या गृहप्रकल्पाला कोणतीही आर्थिक संस्था किंवा बॅंकेने मान्यता दिली असेल आणि त्यासाठी ते अर्थसाह्य करत असेल तर खरेदीदाराची जोखीम बऱ्यापैकी कमी राहते. एखादा नवखा विकासक प्रकल्प साकारताना अचानक उद्‌भवलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी फारसा सक्षम नसतो. तुलनेने प्रतिष्ठित आणि जुना विकासक हा अनुभवाच्या आधारावर अशा समस्यांचा तातडीने निपटारा करण्यास सज्ज असतो. त्यामुळे अनुभवी विकासक निवडण्यास प्राधान्य द्यावे, त्याचबरोबर गृहप्रकल्प तयार होताना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काम थांबले आणि तो प्रकल्प तयार करण्यासाठी बॅंक मदत करत असेल तर विकसकाला अडचण येणार नाही आणि ग्राहकांनाही वेळेत ताबा मिळेल. म्हणून विकासाला बॅंक किती सहकार्य करत आहे, हे जाणून घ्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.