मालमत्ता खरेदी करताना (भाग-२)

मालमत्ता खरेदी करताना (भाग-१)

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी खरेदीदाराने जमिनीशी निगडीत कागदपत्रांची तपासणी करणे अनिवार्य आहे. ज्या जमिनीवर गृहप्रकल्प तयार होत आहे, तो वैध आहे की नाही, हे पाहवे. यासंदर्भातील माहिती नोंदणी कार्यालयात मिळू शकते. विकसकाकडे बांधकामासंदर्भात सर्व परवानग्या मिळाल्यात की नाही, हे पाहवे. कोणत्याही विकसकाला एखादा प्रकल्प साकारण्यासाठी 40 ते 50 प्रकारच्या मंजुरी घ्याव्या लागतात. त्यात अग्निशमन दल, पर्यावरण विभाग यांची मंजुरी याचा समावेश असतो. गृहप्रकल्पाचा नकाशा, जमिनीची हद्द यासारख्या गोष्टी तपासायला हव्यात. मालमत्तेबाबत कोणता कायदेशीर वाद तर नाही ना, हे पाहवे. त्यावर कर्ज तर घेतलेले नाही ना, हे देखील तपासून घ्यावे.

गृहप्रकल्पाच्या प्रत्येक बाजूचे समाधान झाल्यानंतरच महानगरपालिका भोगवटा प्रमाणपत्र जारी करते. हे कागदपत्रे महत्त्वाचे मानले जाते. संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन त्या कागदपत्राची माहिती आपण मिळवू शकतो. त्याशिवाय टायटल, प्रुफ ऑफ राइटचे कागदपत्र, सरकारकडून मंजूर झालेला बिल्डिंग प्लॅन, मालमत्ता कर भरलेल्या पावत्या, कंप्लिशन सर्टिफिकेट, ऑक्‍यूपेसी सर्टिफिकेट आदी कागदपत्रांची तपासणी करावी.

गुंतवणूकदार किंवा ग्राहक या नात्याने घर खरेदी करार आपल्या पद्धतीनुसार तयार केला आहे की नाही, हे पाहवे. अनेकदा विकासक हे या करारात एक्‍सकेलेशन क्‍लॉजचा समावेश करतात. हा क्‍लॉज काढून टाकायला सांगा. जर हा क्‍लॉज असेल तर कालांतराने विकासक घराची किंमत वाढवू शकतो किंवा अन्य शूल्क आकारू शकतो. गृहप्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेचाही यात उल्लेख करायला सांगा. विलंब झाल्यास भरपाईचा देखील समावेश करावा. गृहप्रकल्पात दिल्या जाणाऱ्या सुविधांचा उल्लेख ठळकपणे करायला सांगा. पेमेंट करण्याची पद्धत, ऑक्‍यूपेसी सर्टिफिकेटचे विवरण, इमारतीचा विमा आदींची माहिती देखील असावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.