India vs England 1st T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यामधील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (22 जानेवारी) कोलकत्ताच्या ईडन गार्डन्स मैदानावर होईल. मागील काही कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरीही संघाची टी-20 मधील कामगिरी चांगली राहिली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नियमितपणे टी-20 मालिकेत विजयी झाला आहे.
या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असेल, तर इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलरकडे असेल. दोन्ही संघामधील पहिला टी20 सामना किती वाजता सुरू होणार आहे? तुम्ही हा सामना कुठे पाहू शकतो व संघामध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल? याविषयी जाणून घेऊया.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील आतापर्यतची कामगिरी
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत 24 टी20 सामने खेळले गेले आहेत. यातील 13 सामन्यात भारताचा विजय झाला आहे, तर 11 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील शेवटचा टी20 सामना 27 जून 2024 ला वर्ल्ड कपमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला होता.
India vs England 1st T20I: कधी व कुठे होणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पहिला टी20 सामना 22 जानेवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर पार पडणार आहे.
India vs England 1st T20I: किती वाजता सुरू होईल सामना?
साडेसहा वाजता दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. त्यानंतर 7 वाजता सामना सुरू होईल.
India vs England 1st T20I: कुठे पाहता येईल सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पहिल्या टी20 सामन्याचा आनंद तुम्ही स्मार्टफोनवर देखील घेऊ शकता. हा सामना तुम्ही डिझ्नी+ हॉटस्टार अॅपवर पाहता येईल. हॉटस्टारवर इंग्रजी, हिंदीसह वेगवेगळ्या भाषेतील कॉमेंट्रीचा आनंद घेता येईल. तसेच, स्टार स्पोर्टस नेटवर्कवरूनही तुम्ही हा सामना पाहू शकता.
भारत आणि इंग्लंडचे संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर),
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लायम लिविंगस्टोन, आदिल राशिद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वुड.