नौशाद अली हे भारतीय सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक समजले जातात. आजही हिंदी चित्रपटांमधील त्यांनी दिलेली सुमधुर गाणी आपल्या मनाला भुरळ पाडतात. हिंदी चित्रपटांसाठी हिंदुस्थानी शास्त्रीय रागदारीचा वापर करणारे ते प्रतिभावान संगीतकार होते. नौशाद अली यांची आज पुण्यतिथी आहे. 25 डिसेंबर 1919 रोजी नौशाद अली यांचा जन्म झाला तर 5 मे 2006 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी केवळ 67 चित्रपटांत आपले संगीत दिले, मात्र या सर्वच चित्रपटातील गाणी अप्रतिम अशीच होती.
नौशाद अली यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. लहानपणी नौशाद क्लबमध्ये जाऊन मूक चित्रपट बघायचे. तेव्हापासून नोट्स तयार करण्याची त्यांना सवय लागली. इतकेच नाही तर नौशाद अली लहानपणी संगीत वाद्यांच्या दुकानात काम करायचे जेणेकरुन त्यांना हार्मोनियम वाजविण्याची संधी मिळावी.
1940 च्या ‘प्रेम नगर’ चित्रपटात नौशाद अली यांनी प्रथमच गाणी कंपोज केली. नौशाद अलीच्या लग्नानंतरही त्याच्या संगीतकारांना हे माहित नव्हते की तो संगीतकार आहे. जेव्हा नौशाद यांचे लग्न झाले होते, तेव्हा त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे सूर त्यांच्या लग्नात वाजवले जात होते. मात्र, त्यांनी स्वतः हे गाणे संगीतबद्ध केले हे नौशाद कुटुंबियांना सांगू शकले नाहीत.
त्यांच्या लग्नाचाही एक गमतीदार किस्सा आहे. नौशादच्या सासऱ्यांना सांगण्यात आले होते की ते टेलर व्यावसायिक आहेत. वास्तविक, त्या काळी संगीताशी संबंधित कामाला चांगले मानले जात नव्हते. संगीतकार गुलाम मोहम्मद साहब यांच्या निधनानंतर ‘पाकीजा’ या अद्भुत चित्रपटाच्या संगीतालाही नौशाद अली यांचा हातभार लाभला. त्यांनीच त्या चित्रपटाचे संगीत पूर्ण केले.
1981 मध्ये नौशाद अली यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 मे 2006 रोजी नौशाद यांचे निधन झाले. 2005 मध्ये ‘ताजमहाल: ऍन एटर्नल लव्ह स्टोरी’ चित्रपटासाठी नौशाद यांनी अखेरचे गाणे संगीतबद्ध केले होते.