व्हॉट्‌सऍपचा पुन्हा युटर्न

व्हॉट्‌सऍपने 15 मे पासून लागू होणारे गोपनियतेचे धोरण स्थगित केले आहे. नवीन गोपनियता धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही, असे व्हॉट्‌सऍपने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्‌सऍपनुसार, नवीन गोपनियता धोरणाचा मेसेज वापरकर्त्यांना पाठवत राहणार, ही प्रक्रिया पुढचे काही आठवडे सुरू राहणार. वापरकर्ते कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड आणि रिसिव्ह करू शकतात, असे व्हॉट्‌सऍपने म्हटले आहे. या डेटाचा वापर आता कंपनीदेखील करणार आहे.कंपनी तो डेटा शेअर करू शकणार आहे.

15 मेपर्यंत वापरकर्त्यांनी गोपनियता धोरणाचा स्वीकार न केल्यास खाते बंद होणार होते. परंतु आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र कंपनीने नवीन गोपनियता धोरण लागू करण्यासाठीची नवीन तारीख सांगितलेली नाही. नवीन गोपनियता धोरण 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होते. परंतु यावरून विवाद उभा राहिल्याने ही तारीख 15 मे पर्यंत वाढवण्यात आली. आता पुन्हा व्हॉट्‌सऍपने हे धोरण सध्यातरी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.