मॅसेज करण्यासाठी सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. कॉलेज-शाळेतील मित्रांपासून ते कामापर्यंत सगळ्यासाठी व्हॉट्सअॅप हे साध सोपं माध्यम झालं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपमध्ये प्रतिदिन इतके मॅसेज येतात की एखादा जुना मॅसेज शोधायचा असेल तर त्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. हेच लक्षात घेता व्हॉट्सअॅप याकरिता एक नवीन फिचर आणणार आहे.
जर तुम्ही एखाद्या खास दिवशी पाठविलेला मॅसेज शोधू पाहता तर तारखेनुसार म्हणजेच सर्च बाय डेट(Search by Date) या नवीन फिचरव्दारे सहज तो मॅसेज शोधू शकाल.
Wabetainfo यांच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून यावर सध्या टेस्टिंग चालू आहे. हे फिचर सर्वात आधी आयफोनमध्ये उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर अॅन्ड्राईड डिव्हाईसमध्ये वापरता येईल.
सर्च बाय डेट साठी व्हॉट्सअॅपवर एक कॅलेडंर आयकाॅन जोडण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप यूजर्स जेव्हा या आयकाॅनवर क्लिक करतील तेव्हा व्हॉट्सअॅप एक तारीख पिकर दाखवेल. येथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तारीख सिलेक्ट करून मॅसेज पाहता येतील.
व्हॉट्सअॅपवर सर्च बाय डेट फिचरच्या मदतीने तुम्ही तारखेनुसार मॅसेज शोधू शकाल. हे फिचर आल्यानंतर यूजर्सला एक कॅलेडंर आयकाॅन दिसेल, तिथे यूजर्स पाहिजे त्या तारखेनुसार मॅसेज शोधू शकेल.
माहितीसाठी, या फिचर व्यतीरिक्त व्हाॅटसअॅपमध्ये मल्टीडिव्हाईस सपोर्ट, आॅटोमॅटिक मॅसेज डिलीट आणि इन-अॅप ब्राउजर सारखे फिचर्स लवकरच उपलब्ध होणार आहेत.