Whatsapp ने म्हटलं, “आम्हाला तुमच्या गोपनीयतेची काळजी” ; तुमच्या स्टेटसला शेअर केले ‘हे’ फोटो

नवी दिल्ली : गेल्या काही दिवासंपासून आपल्या नव्या पॉलिसीवरून व्हॉट्सअॅपने नवा वाद ओढवून घेतला आहे. अशातच युझर्सच्या विरोधामुळे व्हाट्सअपने एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हायव्हसी पॉलिसीवर युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.त्यानंतर आज पुन्हा एकदा व्हाट्सअपकडून युजर्सला विश्वासात घेण्यासाठी काही फोटो शेअर केले आहेत.

व्हाट्सअपकडून स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये ‘आम्हाला काळजी आहे तुमच्या गोपनीयतेची’, असे म्हटले आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये ‘जर end to end encrypted वर असलेले तुमचे खाजगी चॅट व्हाट्सअप वाचू किंवा ऐकू शकत नाही.’, असे सांगितले आहे.

तिसऱ्या फोटोमध्ये व्हाट्सअप तुम्ही शेअर केलेल लाईव्ह लोकेशन पाहू शकत नाही.’ असे म्हटले आहे.

तसेच चौथ्या फोटोमध्ये ‘व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकसोबत शेअर करत नाही.’,असे म्हटले आहे.

युझर्सच्या याच नाराजीनंतर व्हाट्सअपने एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपनं हे चार फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला शेअर केले आहेत.

तसेच व्हाट्सअपकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘8 फेब्रुवारीला कोणालाही व्हॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावे लागणार नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करते यासाठी आम्ही काही पावले उचलत आहोत. 15 मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु’, असे म्हटले गेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.