व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा निर्णय; बल्क मेसेज पाठवणारावर करणार कायदेशीर कारवाई

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने एक मोठे पाऊल उचलले आहे. एकदम मोठ्या संख्येने संदेश पाठवणाऱ्या खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅपने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एका ठराविक कालावधीच्या आत जर कुणी हे मर्यादेपेक्षा अधिक संदेश पाठवले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

संदेश पाठवण्याच्या कारवाई बरोबरच जर एखाद्या यूजरने काही मिनिटांत डजनभर ग्रुप बनवले तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येऊ शकते. सध्या हा निर्णय फक्त बिजनेस अकाउंट साठी आहे.

उदाहरणार्थ, जर पाच मिनिटांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप व्यवसाय खाते तयार केले गेले असेल आणि त्या खात्यातून 15 सेकंदात 100 संदेश पाठवले गेले असतील तर कंपनी त्या खात्यावर कारवाई करेल. कंपनी ते खातेही बंद करू शकते.याशिवाय काही मिनिटांत डझनभर ग्रुप तयार करणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटनाही लक्ष्य केले जाईल. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम संदेश तपासण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हा नियम 7 डिसेंबरापासून लागू केला आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम आणि बल्क मेसेजेस आळा घालण्यासाठी बल्क मेसेज फॉरवर्ड करणे थांबवले होते. अशा परिस्थितीत, वापरकर्ते एकाच वेळी केवळ पाच लोकांना संदेश पाठवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.