नवी दिल्ली – नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपने तब्बल 22 लाखांहून अधिक जणांचे खाते बंद केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मासिक अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. इतर वापरकर्त्यांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्याकडूनही व्हाट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि तुमचे अकाउंट बॅन होऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
22 लाख व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी का घातली?
व्हॉट्सअॅपने युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. अॅपच्या अहवालात तब्बल 22 लाख 9 हजार खात्यांवर कायमची बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, ‘युजर्सच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गैरव्यवहार रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीला तक्रारी प्राप्त झाल्या.
स्पॅम संदेश पाठवू नका –
हजारो स्पॅम मेसेज पाठवल्याचे अनेकदा दिसून येते. जर एखाद्याने स्पॅम संदेश पाठवला आणि त्याची तक्रार नोंदवली गेली, तर त्यांचा नंबर ट्रॅक केला जातो आणि योग्य वेळी त्यावर बंदी घातली जाते. त्याच वेळी, जर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे एखाद्याला पॉर्न सामग्री पाठवली तर ते खाते त्वरित ब्लॉक केले जाईल आणि जर एखाद्या वापरकर्त्याने चाइल्ड पॉर्न सामग्री पाठवली किंवा फॉरवर्ड केली तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो.
थर्ड पार्टी अॅप्स वापरू नका-
तुम्ही व्हॉट्सअॅपवर थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तर ते लगेच बंद करा. कारण यातून तुमचे खाते बॅन होऊ शकते. अॅप स्टोअरवर अनेक थर्ड पार्टी अॅप्स आहेत. यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येते. थर्ड पार्टी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, असेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. अॅप दर महिन्याला स्कॅनिंग करते. जर एखादा वापरकर्ता थर्ड पार्टी अॅप्स वापरताना पकडला गेला तर त्याच्यावर बंदी घातली जाते. पण ही तात्पुरती बंदी आहे. म्हणजेच, पुनरावलोकनानंतर, तुमचे खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.