मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीने महिलांच्या वाढत्या डिमांडिंग स्वभावाबाबत आणि मुलांवरील वाढत्या दबावाबाबत सांगितले आहे. एकीकडे या व्हिडिओला चांगलाच पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे सोनालीला इंटरनेटवर खूप ट्रोल केले जात आहे. दरम्यान, उर्फी जावेदने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेद म्हणाली की,’मुलींनी हक्काने मागणी केली पाहिजे.’
सोनालीचा व्हिडीओ रिट्विट करत उर्फी जावेदने लिहिले की, ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप असंवेदनशील आहे. आपण आधुनिक महिलांना आळशी म्हणत आहात, जेव्हा त्या एकाच वेळी त्यांचे कामच नव्हे तर घरातील कामे देखील सांभाळत असतात. जर एखाद्या मुलीला तिचा नवरा चांगला कामविणारा अपेक्षित असेल तर त्यात गैर काय आहे. शतकानुशतके, पुरुषांनी स्त्रियांना केवळ मुले निर्माण करण्यासाठीच यंत्र मानले आणि होय, लग्नाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हुंडा. मुलींनो, विचारण्यास किंवा मागणी करण्यास घाबरू नका. होय, मुलींनी काम केले पाहिजे हे तुमचे बरोबर आहे, परंतु प्रत्येकाला हा विशेषाधिकार मिळत नाही. कदाचित आपण ते पाहू शकत नाही.’
सोनाली व्हिडिओमध्ये म्हणतेय, ‘भारतातील अनेक मुली आळशी आहेत, त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा आहे ज्याची नोकरी चांगली आहे, ज्याच्याकडे घर आहे… ज्याच्या पगार चांगला आहे. पण तू माझ्याशी लग्न करून मी काय करीन हे सांगण्याची हिंमत त्या मुलीत नाही. मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा, ज्या सक्षम असतील. जे स्वतःसाठी कमवू शकतात…. जे म्हणू शकतात की हो आम्हाला नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तुम्ही अर्धे पैसे द्या, मी अर्धे पैसे देईन. मी भांडणाबद्दल बोलत नाही, पण त्याच्यात इतकी क्षमता असली पाहिजे.’