लखनौ – आपल्या आजोबांना ऑक्सिजनची गरज असून मदत करण्यासंदर्भातील मेसेज पोस्ट केल्याप्रकरणात उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
या तरुणाने भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटा मेसेज व्हायरल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शशांक यादव या तरुणाचे नाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून नातेवाईकांना ऑक्सिजन हवा असल्याची मागणी केली आहे.
अशाचप्रकारे शशांकनेही त्याच्या आजोबांसाठी ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट सोमवारी केले होते.