मुंबई : निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला गेले असले तरी अजूनही उद्धव ठाकरे यांना त्यांच्या एकनिष्ठ शिवसैनिकांनी साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शिवसैनिकांकडून मुंबईत बॅनर लावण्यात आले आहेत.
शिवसेना भवनाखाली बॅनर लावण्यात आले आहेत. “निर्णय काहीही असो आम्ही शिवसैनिक कायम मातोश्री आणि ठाकरे परिवारासोबत एकनिष्ठ असणार आहोत”, असे बॅनर सेनाभवनाखाली लावण्यात आला आहेत.