इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी धार्मिक बाबतीत सल्ला देण्यासाठी एका मौलवीची नियुक्ती केली असून या मौलवीने नुकतेच एक अजब विधान केले आहे. महिलांप्रमाणे पुरुषही सुंदर असल्याने जाहिरातींमध्ये महिलांचा वापर करण्याची गरजच काय असा अजब युक्तिवाद या मौलवीने केला आहे.
मौलाना ताहीर अश्रफी नावाच्या या मौलवीला मौलाना टून या नावाने ओळखले जाते. त्यांच्या या अजब विधानानंतर पाकिस्तानातच त्यांची मोठ्या प्रमाणावर चेष्टा केली जात आहे. लाहोरमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना मौलाना ताहीर यांनी जाहिरातीच्या जगात महिलांना अनावश्यक आणि अतिरिक्त महत्त्व दिले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पाकिस्तानमधील पुरुषही दिसण्यास सुंदर असल्याने त्यांचा जाहिरातींमध्ये सर्वात जास्त वापर व्हायला व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
इम्रान खान यांनी तब्बल 22 सल्लागारांचे एक मंडळ तयार केले असून त्यामध्ये धार्मिक बाबतीत सल्ला देण्याचे काम हे मौलवी करतात. गेल्यावर्षी एका जाहीर कार्यक्रमात मौलाना दारूच्या नशेत आले होते आणि तेव्हा त्याने अनेक विचित्र प्रकार केले होते.
तेव्हापासून इमरान खान यांचा हा धार्मिक सल्लागार मौलाना टून या नावाने ओळखला जातो. त्यामुळे त्याने व्यक्त केलेल्या कोणत्याही विचाराला पाकिस्तानात मध्येच महत्त्व दिले जात नाही. महिलांना जाहिरातीमध्ये प्राधान्य दिले जात असल्याबद्दलच्या त्याच्या विधानाचीही पाकिस्तानमध्ये खिल्ली उडवली जात आहे.