मुंबई – अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. होय, अभिनेता सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे.
View this post on Instagram
मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. आज सकाळी 9 वाजता करिनाने बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. सध्या कपूर आणि खान परिवार अतिशय आनंदात आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, आता सोशल मीडियावर करीना आणि सैफ आपल्या दुसऱ्या दाम्पत्याचे काय नाव ठेवणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भातील अनेक मिम्स सुद्धा ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. सैफ-करीनाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते. 2016 मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता.