Sharad Pawar राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर घेत कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत चिन्ह पोहचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
दरम्यान, वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर खूप मोठ चॅलेंज आहे. आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू झाला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्यायांवर विचार केला जात आहे. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.
शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु
शरद पवार गटाला मंगळवार आज दुपारपर्यंत नवीन पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडे द्यावं लागणार आहे. अशात आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नाव आणि पक्षाचं चिन्ह सादर करण्यात येणार आहे.
नव्या पक्षासाठी शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी स्वाभिमानी पक्ष या नावांचा विचार आणि चर्चा सुरु आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरु आहे. काही वेळात या संदर्भात निर्णय समोर येईल.