यंदाच्या बजेटमध्ये काय होणार घोषणा?

नवी दिल्ली  – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करतील. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु होईल.

दरम्यान आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार?

. यंदा बजेटमध्ये टॅक्‍स स्लॅबची सीमा वाढवली जाण्याची शक्‍यता आहे.
. ग्रामीण भारतात अधिक खर्च केला जावू शकतो. महिलांच्या सुरक्षेततेसाठी काही घोषणा होऊ शकतात.
. स्वच्छ पेयजलसाठी अधिक तरतूद केली जावू शकते.
. शिक्षणावर लाख कोटीपेक्षा अधिकची तरतूद केली जावू शकते.
. मेक इन इंडियावर नवी योजना सुरु केली जावू शकते.
. निर्यात वाढवण्यासाठी नव्या योजनांची घोषणा होऊ शकते.
. रोजगार वाढवण्यासाठी छोट्या उद्योगांना पॅकेज दिले जावू शकते.
. इंफ्रास्ट्रक्‍चरवर सरकार आणखी खर्च वाढवला जावू शकतो.
. रेल्वेमध्ये सरकार आणखी मोठी गुंतवणूक करु शकते.
. घरगुती उत्पादनांना चालना देण्यासाठी इतर प्रोडक्‍टवर इंपोर्ट ड्यूटी लावली जावू शकते.
. शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या योजनेतून मिळणारी रक्कम वरुन केली जावू शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.