काय गरज होती ड्रग्ज घ्यायची ? या कॉमेडियनने विचारला खोचक सवाल

तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने हर्षला अटक केली

मुंबई –   प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. या प्रकरणावरुन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता भारती पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने हर्षला अटक केली. यातच कॉमेडीयन राजू श्रीवास्तवने यावर प्रतिक्रिया दिली आहे

काय म्हणाले राजू श्रीवास्तव

‘काय गरज होती ड्रग्ज घ्यायची. ड्रग्ज न घेता कॉमेडी करु शकत नाही का? मी भारतीसोबत खूप वेळा काम केले आहे. अनेक मुले तिला आदर्श मानत होते. इंडस्ट्रीमधील सर्वचजण असे नाहीत. पण दररोज बॉलिवूडमधील कोणाचे ना कोणाचे नाव समोर येत आहे. आता टीव्ही कलाकारांची नावे येत आहेत. मला अतिशय दु:ख झाले आहे. ‘

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.