गळ्यात पडणाऱ्या आर्थिक उत्पादनांचे काय करावे? (भाग-1)

बॅंका किंवा बिगर बॅंकिंग वित्तिय संस्था (एनबीएफसी) मधील रिलेशनशिप मॅनेजर आणि सेल्स टीम नेहमीच अतिशय दबावाखाली काम करत असते. विशिष्ट टार्गेट ठरलेल्या मुदतीत पूर्ण करणे त्यांच्यासाठी आवश्‍यक असते. अनेकदा असे टार्गेट अव्यवहार्य असते. त्यातून मग हितसंबंधाचे मुद्दे उपस्थित होतात आणि ग्राहकांसाठी जे गरजेचे आर्थिक उत्पादन आहे ते न विकता सेल्स टीममधील सदस्य त्यांच्या सोयीचे म्हणजेच टार्गेट पूर्ण होण्याच्या दृष्टीने सोयीचे उत्पादन ग्राहकांच्या गळ्यात मारत असतात.

उदाहरणार्थ, निवृत्तीला आलेले 56 वर्षांचे गृहस्थ दरमहा विशिष्ट रक्कम मिळावी म्हणून बॅंकेत रू. 10,00,000 ची मुदत ठेव (एफडी) करण्यासाठी येतात आणि त्याठिकाणी उभा असणारा रिलेशनशिप मॅनेजर त्यांना लाभांशातून जास्तीच्या परताव्याचे अमिष दाखवून बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक करण्यास सुचवतो. हा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यामागील पहिले कारण म्हणजे बॅलन्स्ड फंडाचा लाभांश नियमित मिळेल याची कुठलीही खात्री नसते. तो कधीही थांबवला जाऊ शकतो. त्याउलट त्यांना दहा लाख रुपये मुदत ठेवीत ठेवल्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळण्याची निश्‍चित शाश्‍वती असते. दुसरे कारण म्हणजे निवृत्तीला आलेल्या व्यक्तीने हातातील सगळी रक्कम शेअर बाजाराशी संबंधित पर्यायामध्ये गुंतवू नये.

गळ्यात पडणाऱ्या आर्थिक उत्पादनांचे काय करावे? (भाग-2)

जेव्हा फायनान्शियल अडव्हाझर त्याच्या क्‍लायंटला अयोग्य सल्ला देतो किंवा गुंतवणुकीतील जोखिम समजावून सांगत नाही, पुरेशी माहिती देत नाही किंवा ग्राहकासमोर उपलब्ध सर्व पर्याय ठेवत नाही आणि विशिष्ट आर्थिक उत्पादन घेण्याइतपत मर्यादित माहिती सांगून ते उत्पादन घ्यायला लावतो तेव्हा ती ग्राहकांची दिशाभूल असते. यालाच मिस-सेलिंग म्हटले जाते.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)