लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणावर पालकांनी काय करावे?

पालकांनी मुलांच्या शाळेतील शारीरिक फिटनेस उपक्रमांमध्ये विशेष रस घ्यावा.जर तुमची मुले एकलकोंडी असतील व त्यांना इतर मुलांसोबत खेळण्यात रस नसेल तर तुम्ही त्यांना वैयक्तिक खेळ किंवा ऍक्‍टीव्हीटीज मध्ये गुंतवा ज्यामुळे ते स्वस्थ व निरोगी राहतील.

पालकांनी काय करावे –
मुलांना योगासनांचा सराव करण्यास सांगा योगासनांमुळे मुले निरोगी व उत्साही होतात. यासाठी तुमच्या मुलांना योगासनांचा सराव करण्यास शिकवा. प्राचीन काळीदेखील निरोगी आयुष्यासाठी विद्यार्थांना सूर्यनमस्कार व प्राणायाम शिकविले जात असत. मुलांनी योगासने कोणत्या वयात करावीत ते जाणून घ्या.

पालकांनी काय करावे –
मुलांना एरोबिक्‍स करण्यास सांगा
व्यायाम, सायकलिंग, नृत्य हे देखील प्रभावी व्यायाम प्रकार आहेत, जे केल्यामुळे कॅलरीज कमी होतात, मेटाबॉलिजम सुधारते आणि वजन कमी होते.

पालकांनी काय करावे –
मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या मुलांसाठी खेळ हादेखील एक उत्तम व्यायाम प्रकार असू शकतो. यासाठी मुलांना त्यांच्या आवडत्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना ग्रुप एक्‍टीव्हिटीमध्ये गुंतवण्यापेक्षा जिथे कमी लोकांची गरज असते अशा आर्चरी, राईफल शूटींग, टेबल-टेनिस, स्कॉश, शॉट-पुट या खेळांमध्ये गुंतवा ज्यामुळे ते फीट राहतील व त्यांचे वजन कमी होईल.

पालकांनी काय करावे –
मुलांच्या जीवनशैलीत बदल करा
एका संशोधनात मुले टीव्ही पाहणे, मोबाईल, कॉम्प्यूटर, प्ले स्टेशन यांमध्ये जास्त रमतात असे आढळले आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यामधील लठ्ठपणा अधिकच वाढतो. यासाठी पालकांनी मुलांच्या गॅजेट्‌स वापरण्यावर व जंक फूड खाण्यावर निर्बंध घालते पाहिजेत.

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार कसा असावा?
पौष्टिक पदार्थांची चव मुलांना आवडत नसल्याने मुले ते पदार्थ खाण्यासाठी टाळाटाळ करतात.पण चांगले पौष्टिक पदार्थ मुलांना खाण्यास लावणे हे पालकांचे प्रमुख कर्तव्य आहे.

मुलांसाठी काही डाएट टिप्स
मुलांना ताजे अन्नपदार्थ खाण्यास द्या ताज्या भाज्या व फळांचा शरीरावर चांगला परिणाम होतो.शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठी मुलांच्या आहारात याचा समावेश करा. ज्यामुळे मुलांच्या शरीरातील फॅट्‌स कमी होते व मेटाबॉलिजम सुधारेल.

मुलांना पालेभाज्या खाण्यास प्रोत्साहन द्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फायबर व कॅलशियम आणि विटामीन-बी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे मेटाबॉलिजम सुधारते व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामुळे मुलांची स्मरणशक्‍ती देखील वाढते.

भरपूर फळे खा
विटामिन्स ए,सी आणि ई युक्‍त फळांमुळे मुलांमधली स्मरणशक्‍ती वाढते व मेटाबॉलिजम सुधारते. मुलांना मधल्या वेळेत फळे दिल्याने मुलांचे पोट भरेल. त्यामुळे ते वजन वाढवणारे इतर पदार्थ खाणार नाहीत.

मुलांच्या पौष्टिक खाण्यावर भर द्या
गहू, ओट्‌स, बार्ली, वाटाणे, सोयाबीनसारख्या पौष्टिक धान्यांमुळे मेंदू कार्यक्षम होतो व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. या पदार्थामुळे मुलांची भूक व्यवस्थित भागल्याने मुले बाहेरचे पदार्थ कमी खातात.

ड्राय फ्रुट्‌स खाण्यास द्या
अक्रोड, बदामामध्ये ओमेगा-3 व झिंकसारखी पोषणमूल्ये असतात, ज्यामुळे मेंदूला योग्य चालना मिळते. पोषक कॅलरीसह ड्रायफ्रूट्‌समध्ये त्वरित ऊर्जा देण्याची देखील क्षमता असते. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते

मुलांना भरपूर पाणी पिण्यास सांगा
भरपूर पाणी प्यायल्याने पचनशक्‍ती सुधारते व शरीरातील टॉक्‍सिन्स बाहेर टाकले जातात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने
मेटाबॉलिजम सुधारते. लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचा रसामुळे देखील   शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.