मुंबई : तान्हाजी चित्रपटाबद्दल अभिनेता सैफअली खान यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे नवीनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सैफ अली यांनी एका मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
तान्हाजी चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अर्धवट असून तो चुकीचा आहे. मी चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर भूमिकेच्या प्रेमात पडल्यामुळे त्यावर मी ठाम मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना मला काही गोष्टी खटकत होत्या पण मला भूमिका सोडायची नव्हती त्यामुळे मला काही बोलता आले नाही.
दरम्यान या महिन्याच्या 10 तारखेला तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तान्हाजी चित्रपटात अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.