प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा? राहुल यांच्याकडून चाचपणी

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा कॉंग्रेस प्रवेश निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. एवढेच नव्हे तर, किशोर यांना कुठला रोल द्यावा याची चाचपणीही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केल्याचे समजते.

पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून तृणमूल कॉंग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तृणमूलच्या त्या यशात किशोर यांचे योगदान महत्वाचे मानले गेले. त्या निवडणुकीनंतर किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचा मानस व्यक्त केला. 

काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. तेव्हापासून किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशात राहुल यांनी मागील आठवड्यात त्यांच्या निवासस्थानी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. 

त्यामध्ये ए.के.अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे, कमल नाथ, अंबिका सोनी, हरीष रावत, के.सी.वेणुगोपाल आदी नेते सहभागी झाले. किशोर हे त्या बैठकीचा मुख्य अजेंडा होते. किशोर यांना कॉंग्रेसमध्ये स्थान देण्याचे फायदे-तोटे आणि त्यांच्यावर कुठली जबाबदारी सोपवायची या मुद्‌द्‌यांवर बैठकीत चर्चा झाली. बहुतांश नेत्यांनी किशोर यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसला लाभच होईल अशी भूमिका घेतल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.