दूतावासातील चमत्कारिक आवाजांचे रहस्य काय?

गूढ हवाना सिंड्रोमचा अनेक अमेरिकन दूतावास अधिकाऱ्यांना त्रास
 वाशिंग्टन : जगातील काही  देशांच्या राजधान्यामध्ये ज्या ठिकाणी अमेरिकेचे दूतावास कार्यरत आहेत. त्या दूतावासामध्ये एका चमत्कारिक आवाजामुळे तेथील अधिकाऱ्यांना खूप त्रास होत आहे.  हा चमत्कारिक गूढ हवाना सिंड्रोम म्हणून ओळखला जातो.

अद्यापही या आवाजाचे रहस्य उलगडण्यात अमेरिकन अधिकाऱ्यांना अपयश आले आहे.  यापूर्वी अमेरिकेचा शेजारी असलेल्या क्युबाची राजधानी हवानामध्ये अमेरिकन राजदूतावात कार्यरत असलेल्या काही अधिकार्यांना हा गूढ आवाज आला.  या आवाजाचा त्या सर्व अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला.  डोके दुखणे, पोट दुखणे, कामात मन न लागणे अशा प्रकारचे परिणाम त्यांना जाणवू लागले.  हा आवाज कोठून येत आहे हे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला,  पण त्यामध्ये यश आले नाही.

आणखीन काही देशांमधील अमेरिकन दूतावासामध्येही अधिकाऱ्यांना अशाच प्रकारच्या आवाजाचा सामना करावा लागला.  सुमारे 135 अमेरिकन अधिकाऱ्यांनी या आवाजाचा अनुभव घेतला असून विविध दूतावासात ऐकू येणाऱ्या आवाजाला आता हवाना सिन्ड्रोम म्हणून ओळखले जाते.  तंत्रज्ञानाने समृद्ध अशा अमेरिकेतील अधिकाऱ्यांनाही या आवाजाचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही.

काही अधिकाऱ्यांच्या मते दूतावासाच्या आसपास जी विविध प्रकारची उपकरणे कार्यरत असतात त्यामुळे सुद्धा हा आवाज येऊ शकतो. तर काही अधिकाऱ्यांच्या मते दूतावासाच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागे मध्ये असलेला प्राण्यांचे आवाज असू शकतात पण अद्यापही निश्चित असा निष्कर्ष काढण्यात अमेरिकन अधिकाऱ्यांना यश आलेले नाही.

हा गूढ जो आवाज येतो तो भांड्यावर भांडे घासणे यासारखा किंवा एखाद्या डुक्कर ओरडल्या सारखा किंवा एखाद्या चित्कारासारखा असतो. हा आवाज कानावर पडल्यामुळे अधिकारी अस्वस्थ होतात. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना 2014 मध्ये हवाना दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना या आवाजाचा त्रास होत असल्याने त्यांना परत अमेरिकेत बोलावण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.