Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय अग्रलेख

या बैठक सत्रांचे फलित काय? (अग्रलेख)

by प्रभात वृत्तसेवा
August 13, 2019 | 5:50 am
A A
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू

FILE PIC

देशाच्या अर्थव्यवस्थेला चौफेर धग लागली आहे. सर्वच क्षेत्रांतील लोक रोज ओरडून हे सांगत आहेत. तथापि, ही बाब मोदी सरकारच्या अजून पूर्णपणे लक्षात आली नसावी किंवा लक्षात येऊनही त्याकडे ते सोयीस्कर दुर्लक्ष करीत असावेत. पण ही धग आता चांगलीच अंगाशी येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडचणीत आलेल्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी संवादाचे प्रयत्न हाती घेतले आहेत. हे प्रयत्नही केवळ तोंडदेखले आहेत, हे त्या बैठकीच्या वृत्तांतून सहज लक्षात येते. त्यांनी आतापर्यंत अनेक क्षेत्रांतील लोकांच्या बैठका घेतल्या; पण त्या बैठकांमध्ये उपाययोजनांविषयी कोणतीच वाच्यता केली गेलेली नाही. या बैठकांमधील निर्मला सीतारामन यांची देहबोलीच सरकारची असहायता दर्शवत होती.

पडलेल्या चेहऱ्याने लोकांची गाऱ्हाणी निमूटपणे ऐकून घेऊन, नंतर काहीच न बोलता चालत्या होणाऱ्या अर्थमंत्र्यांना पाहून बैठकीला आलेल्या लोकांना “आपण आपले गाऱ्हाणे थेट देशाच्या अर्थमंत्र्याच्या कानावर घातले’, एवढेच समाधान लाभते. त्यापेक्षा वेगळे काही फलित या बैठकांमधून निघालेले नाही. अर्थमंत्र्यांनी बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधींशी आणि गृह खरेदीदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकांमध्ये उपस्थित प्रतिनिधींनी आपल्यापुढील अडचणींचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. गेले काही वर्षे बांधकाम क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. नोटबंदी, “रेरा’ कायदा, चुकीचा जीएसटी यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

देशातल्या मोठ्या शहरांमध्ये बांधून पूर्ण झालेल्या साडेबारा लाखांहून अनेक सदनिका, विक्रीअभावी पडून आहेत. हातात घेण्यात आलेले अनेक गृहप्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत. त्यांना होणारा कर्जपुरवठा थांबला आहे. बॅंका आता गृहबांधणी क्षेत्राला कर्ज द्यायला तयार नाहीत. बाजारात मोठी रोकड टंचाई निर्माण झाली आहे. या साऱ्या अडचणींचा बांधकाम व्यावसायिक मुकाबला करीत आहेत. देशातील अनेक मोठे बिल्डर बुडाले, अनेक जण अडचणीत येऊन कारागृहात गेले. काही छोट्या बांधकाम व्यावसायिकांनी तर थेट आत्महत्येचाच मार्ग स्वीकारला. “नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ अणि “क्रेडाई’ या सारख्या संस्थांच्या प्रतिनिधींनी या अडचणी अर्थमंत्र्यांच्या कानावर घातल्या.

डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या सारख्या बांधकाम क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना “रोकड सुलभता’ निर्माण करण्याची गरज पटवून दिली. हे सारे निमूटपणे ऐकून घेऊन थातूरमातूर निवेदन करून, अर्थमंत्री निघून गेल्या. कोणतेही ठोस आश्‍वासन या मंडळीच्या पदरात पडले नाही. कारण आता ही स्थिती सावरण्याची क्षमता सरकारमध्येच उरली नाही. याच्याही आधी भारतीय उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळ आणि संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींनीही त्यांची भेट घेतली. देशातल्या मंदीचा सर्वांत मोठा फटका उद्योगक्षेत्राला बसला असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनेच मदतीचा हात दिल्याशिवाय तरणोपाय नाही.

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी या बैठकीत केंद्राकडे एक लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज मागितले आहे. आर्थिक क्षेत्रात घोंगावणाऱ्या या संकटाबाबत अनेक मोठ्या उद्योगपतींनी काही खडेबोल सुनावून या सरकारला जागे करण्याचे प्रयत्न याआधीच केले आहेत. त्यात राहुल बजाज, किरण मुजुमदार शॉ, आदी गोदरेज, एचडीएफसीचे दीपक पारेख यांचाही समावेश आहे. पण त्यावर सरकार अजूनही काही बोलायला तयार नाही. या मंदीतून उद्योग क्षेत्राला किंवा बांधकाम क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी सरकारचा काय प्लॅन आहे हे जाहीर होताना दिसत नाही. मुळात सरकारला असे काही करण्याची इच्छा आहे काय, हेही लक्षात येत नाही.

उलट “सारे काही आलबेल चालले आहे,’ असेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी आकड्यांची चालवलेली लपवाछपवीही वारंवार उघड झाली आहे. अर्थसंकल्पातील आकडेवारीतही अनेक गफलती आहेत. “कॅग’ने त्या आडवळणाने सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण “कॅग’वाल्यांवरही सरकारची मोठीच दडपशाही आहे. हेच “कॅग’वाले पूर्वी आपल्या अहवालातून सरकारचे बेधडक वाभाडे काढायचे. तसे वाभाडे काढण्याची आता “कॅग’वाल्यांना अनुमती नाही. त्यामुळे सरकारची आकडेवारीच्या खेळातही मनमानी सुरू आहे. सन 2017-18 च्या अर्थसंकल्पात सरकारने आपल्यावर असलेले चार लाख कोटींचे देणे लपवल्याचे “कॅग’च्याच अहवालातून उघड झाले आहे.

वित्तीय तूट कमी झाल्याचा दावा करण्यासाठी हा आटापिटा होता. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळातील एक सदस्य रथिन रॉय यांनी निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या रकमेचा हिशेब लागत नसल्याची बाब उघड केली आहे. विद्यमान सरकारने अशी लपवाछपवी चालवली असली, तरी बाजारातील वस्तुस्थिती लपून राहात नाही. सध्या चारही बाजूने आलेल्या आर्थिक संकटाबाबत सर्वत्र ओरड सुरू झाल्यानंतर सरकारने आपल्याला जाग आल्याचे दाखवण्यासाठी, अर्थमंत्र्यांच्या बैठकांचे हे सत्र सुरू केले आहे.

आर्थिक क्षेत्रातील अडचणींबाबत या क्षेत्रातील व्यक्‍तींशी अर्थमंत्र्यांनी थेट संवाद साधणे चुकीचे नाही. उलटपक्षी ते आवश्‍यकच आहे. पण अशा बैठकांमधून त्यांना जो काही फीडबॅक मिळतो आहे त्यावर सरकारची उपाययोजना काय आहे, हेही त्यांनी जनतेला जाहीर केले पाहिजे. अन्यथा या नुसत्याच आढावा बैठकांना काहीही अर्थ नाही. अडचणींचे पाढे तर प्रसारमाध्यमांमधून रोजच वाचले जात आहेतच. सरकारलाही विविध अहवालातून ही माहिती मिळतेच आहे. त्यामुळे सरकारला या अडचणींची कल्पनाच नाही, असे म्हणता येत नाही. मग प्रश्‍न असा पडतो की, या अडचणी लक्षात येऊनही ही वस्तुस्थिती सरकार मान्य का करीत नाही.

प्रश्‍नच समजला नसेल तर उत्तर शोधता येणार नाही. या साऱ्या अडचणीतून देशाला बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारवरच आहे. त्यांना अर्थव्यवस्थेत काही धोरणात्मक बदल करावे लागतील. बाजारातील मागणी वाढण्यासाठी पैशाची उपलब्धता कशी वाढेल, याकडे लक्ष देणे वगैरेसारखे पर्याय उपलब्ध असतात. त्याचा वापर सरकारने केला पाहिजे. पण हे न करता प्राधान्यक्रमावर नसलेल्या अन्य भावनिक बाबींकडेच सरकार जर जादा लक्ष देणार असेल, तर त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्यामुळेच या तोंडदेखल्या बैठक सत्रांना कसलीच किंमत नाही. लोक आता वास्तववादी आणि ठोस उपाययोजनांच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: editorial articleeditorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

3 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

3 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

3 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांनी पद व पक्ष दोन्ही काढून घेतले?

Most Popular Today

Tags: editorial articleeditorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!