what is the pink liquid । अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग सतत वाढत आहे. अमेरिकन सरकार ही आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी अमेरिकन हवाई दल पाण्यासोबत ‘पिंक लिक्विड’ देखील फवारत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गुलाबी द्रव म्हणजे काय आणि ते कधी वापरले जाते?.. चला तर मग जाणून घेऊ…
आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच
अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीचा मोठा परिणाम लोकसंख्येवर झाला आहे. अमेरिकन प्रशासन ही आग विझवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप ती आटोक्यात आलेली नाही. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीने आता अधिक भयानक रूप धारण केले आहे.
आगीमुळे लाखो कुटुंबांचे नुकसान what is the pink liquid ।
लॉस एंजेलिसमधील आगीमुळे मोठ्या लोकसंख्येला आपले घर सोडावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याठिकाणावरून सुमारे ९२,००० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याच वेळी, लॉस एंजेलिसमध्ये जंगलातील आगीमुळे २५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर ८९,००० लोकांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. आगीमुळे ४०,५०० एकरहून अधिक जमीन जळून खाक झाली आहे.
‘पिंक लिक्विड’ म्हणजे काय? what is the pink liquid ।
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आग विझवण्यासाठी अमेरिकन अग्निशामक ‘पिंक लिक्विड’ चा वापर करत आहेत. या लिक्विडला ‘फॉस-चेक’ असेही म्हणतात. हे लिक्विड अमोनियम फॉस्फेटपासून बनलेले आहे, जे बराच काळ प्रभावी राहते. अग्निशामकांना ते सहज पाहता यावे म्हणून फॉस-चेकमध्ये गुलाबी रंग जास्त प्रमाणात वापरला जातो.
हे गुलाबी द्रव कसे काम करते?
अग्निरोधकाच्या मार्गावर पिंक लिक्विड फवारला जातो. खरंतर हे पिंक लिक्विड पाणी, क्षार (रसायने) आणि खतांचे मिश्रण आहे. त्यात मुळात अमोनियम फॉस्फेट असलेले द्रावण असते. ज्यामुळे झाडांवर एक थर तयार होतो, हा थर ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून आगीचा प्रसार कमी करतो. त्यामुळे आगीचा प्रसार बऱ्याच प्रमाणात थांबतो. बऱ्याच वेळा यामुळे आगही विझते. त्यामुळे लॉस अंजिल्समध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.