मराठा समाजासाठी स्वतंत्रवर्ग करून आरक्षण देण्याची गरज काय ?

ओबीसीत समावेश करा; याचिकाकर्त्यांची मागणी

मुंबई – सुरुवातीपासून मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक असा स्वतंत्र गट करून 16 टक्के आरक्षण देण्याची गरज का? असा सवाल मराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांनी केला आहे.

राज्य सरकारला असा स्वतंत्र गट तयार करण्याचा अधिकार नसल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच ओबीसी म्हणून आरक्षण देण्यात आलेल्या जातीतील समृध्द झालेल्या जातींना आरक्षणातून वगळून मागास असलेल्या मराठा समाजाला ओबीसी गटात आरक्षण दिले पाहिजे. असा दावाही याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. प्रमोद पाटील यांनी केला.

दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असून उद्यापासून राज्य
सरकारच्या युक्तीवादास प्रारंभ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.