काय आहे 18 क्रमांकाचे गूढ, जे भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत युद्धाशी आहे संबंधित!

जन्माष्टमीच्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला क्वचितच माहित असेल. तुम्हाला माहित आहे का, की महाभारत काळ आणि भगवान श्रीकृष्ण यांचा 18 या संख्येशी काय संबंध आहे?

एकेकाळी, आपल्या सभ्यतेचा विकास परमोच्च उंचीवर पोहोचला होता. ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात आपण नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. तथापि, महाभारत युद्ध हा मुख्य केंद्रबिंदू म्हणता येईल, ज्यापासून आपल्या सभ्यतेचे विघटन सुरू झाले. मात्र आजही महाभारत काळाशी निगडित अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याच्याबाबत आपण अजाण आहोत. त्यापैकी एक म्हणजे 18 क्रमांकाचे गूढ. अनेक लोक म्हणतात की महाभारताच्या युद्धात 18 क्रमांकाचे विशेष महत्त्व होते. जेव्हा तुम्ही महाभारताच्या युद्धाचे सखोल निरीक्षण कराल, तेव्हा हा आकडा पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येईल. चला तर, त्याबद्दल जाणून घेऊया.

संपूर्ण महाभारत युद्धात 18 क्रमांकाचे विशेष महत्त्व होते. भगवान कृष्णाने अर्जुनाला एकूण 18 दिवस गीतेचे ज्ञान दिले. महाभारताच्या ग्रंथात फक्त 18 अध्याय आहेत. हिंदू धर्माचे महत्त्वाचे पुस्तक गीता यामध्ये तुम्हाला 18 अध्याय देखील सापडतील. याशिवाय कौरव आणि पांडवांच्या सैन्यात एकूण 18 अक्षौहिणी सैन्य होते.

महाभारत युद्ध घडवून आणण्यासाठी 18 प्रमुख सूत्रधार होते. शेवटी युद्ध संपले तेव्हा फक्त 18 योद्धा शिल्लक होते. महाभारताचे युद्ध एकूण 18 दिवस चालले. दरम्यान, श्रीकृष्णाने अर्जुनाला 18 दिवस गीतेचे ज्ञान दिले.

या कारणास्तव गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. आता प्रश्न उद्भवतो की महाभारत युद्धात 18 मुद्यांची वारंवार पुनरावृत्ती होणे हा खरोखरच योगायोग आहे का? किंवा त्यामागे काही खोल रहस्य दडलेले आहे? कारं योगायोग जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा होतो. प्रत्येक वेळी होत नाही.

बरेच लोक म्हणतात की 18 क्रमांकाच्या मागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. मात्र, आजपर्यंत या रहस्यावरून पडदा काढू शकलेला नाही. जर भविष्यात कोणी महाभारताचे हे गुढ रहस्य उलगडले तर अनेक नवीन गोष्टी समोर येऊ शकतात. महाभारत युद्धाचे रहस्य आणि त्याच्याशी संबंधित 18 क्रमांकाचे गूढ अद्याप कोणालाही कळू शकलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.