देवेंद्रजी तोंड लपवून काय फायदा? राष्ट्रवादीचा तिखट प्रश्न

‘चिटींग करण्याची भाजपाची जुनी परंपरा आहे’

मुंबई: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सत्र न्यायालयात सुनावणीसाठी मागच्या दाराने प्रवेश केला. असे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले. याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला असल तरी पुढील सुनावणीसाठी त्यांना ३० मार्च रोजी हजर राहावे लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरतानाच जर माहिती लपवली नसती तर आज ही वेळ आली नसती. चिटींग करण्याची भाजपाची जुनी परंपरा आहे. याठिकाणी खुद्द माजी मुख्यमंत्र्यांनीच चिटींग केली. आता सत्र न्यायालयाच्या दणक्यानंतर तरी ही जुनी खोड सुटणार का, असा तिखट प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. याबाबत राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. 

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

फडणवीस यांनी 2014 मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यावर दाखल असणाऱ्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. हे गुन्हे 1996 आणि 2003 मधील आहेत. हे गुन्हे दडवणे हा लोकप्रतिनिधी कायच्याच्या कलम 125 अ चे उल्लंघन आहे. या कलमानुसार लोकप्रतिनिधीने आपल्या अर्जात चुकीची माहिती दिली असेल अथवा दाखल गुन्ह्यांची माहिती दडवली असेल तर सहा महिने कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही होऊ शकते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.