काय म्हणतात नगरकर

गो करोना गो
ना पाहिलीस तू जात,
ना पाहिलास तू धर्म
आता असं वाटतयं की,
हे मागच्या जन्मीच कर्म..
ना गरीब, ना श्रीमंत,
असा कोणताही भेद..
अन्‌ जगाला दाखवल तू अस राक्षसी खेद…
चीन आहे तुझा निर्माता,
पण भारत आहे तुझा विनाशकर्ता..
तू केल्यास आमच्या वाटा बंद..
पण आम्ही नक्कीच करु, तुझा तोरा मंद
जगाला असा विळखा घातलायस,
की प्रत्येक कानाकोपऱ्यात
तुझा सहवास लाभलाय..
घराबाहेर पडणं खूप अवघड केलयसं..
बाहेर पडावं तर, मास्कच बंधन टाकलयस
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा पहारा
अन्‌ डॉक्‍टरांचा अन्‌ फार्मासिस्टचा सहारा
जनतेला सोडलस तू घाबरुन
आता तरी जा तू खरडून
सगळ्या देवांचे दरवाजे केलेस तू बंद
अन्‌ भक्तांच्या भक्तीत पाडलास तू खंड
कोविड-19 विना बातमीच नाही सध्या
मीडियावाले वार्ता करुन
करुन झाले खूप ठायी
तु वाढत जरी असला संसर्गाने
पण तुझा नायनाट केला जाईल महामार्गाने
साखळी जरी जोडत असला धाग्याधाग्याने
लवकरच करोना कीट तोडत असेल रागारागाने
माझ्या देशाचे संकट लवकरच टळेल
हा संदेश राष्ट्राला ताबडतोब कळेल.
खूप जीवांना केलयं, तू क्वारंटाईन
अन्‌ लवकरच येईल तुझा पण टाइम
गो करोना गो,
मागून दिला जाईल खो…

प्राजक्ता शरद गरड , नगर. संपर्क : 7447565151. 

Leave A Reply

Your email address will not be published.