पुणे तिथे काय उणे! बायडेन ‘भाऊ’ अन् कमला ‘आक्का’ यांच्या अभिनंदनाचे झळकले फ्लेक्स

पुणे – अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅट नेते जो बायडेन यांनी बुधवारी शपथ घेतली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही पदाची शपथ घेत त्या देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा होण्याचा मान मिळवला. तसेच जो बायडेन यांनी सूत्रे हाती घेण्याआधीच तेथील प्रशासनात 20 भारतीयांची व्हाईट हाउसमधील प्रमुख पदांवर नियुक्ती केली आहे. भारतीयांच्या या कनेक्शनचे महत्व जाणून पुण्यातून बायडेन आणि हॅरिस यांना फ्लेक्सद्वारे विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीनंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच पुण्यातही थेट फ्लेक्सद्वारे अभिनंदन करण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा उल्लेख चक्क भाऊ आणि कमला हॅरिस यांचा उल्लेख आक्का असा करण्यात आला आहे. 

घासून नाय तर ठासून आलोय ! या मथळ्याखाली अभिनंदन करणारा हा फ्लेक्स पुण्यात झळकला आहे. शिवप्रेमी दिव्यांग, लिम्का बूक रेकॉर्डर – पोपटराव जयवंतराव खोपडे यांच्या नावाने हा फ्लेक्स लागला आहे.

भारती विद्यापीठाच्या समोरील पादचारी पुलावर हा फ्लेक्स लावण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.