एफएफडी म्हणजे काय? (भाग-२)

एफएफडी म्हणजे काय? (भाग-१)

एफएफडी म्हणजे काय ?
फ्लेक्‍झी फिक्‍स्ड डिपॉझिट म्हणजेच एफएफडी हा एक एफडीचाच एक प्रकार आहे. या मुदत ठेवीत आपण सात दिवसांपासून दहा वर्षाच्या काळापर्यंत रक्कम जमा करू शकता. बॅंक आपल्याला सध्याच्या काळानुसार 6.5 पासून ते 7.5 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज देते. काही खासगी बॅंका आठ टक्‍क्‍यांपर्यंत व्याज देत आहेत. बॅंकेत मुदत ठेवण्याचे एकच नुकसान म्हणजे जर आपल्याला पैशाची गरज भासली तर आपल्याला मुदत ठेवी मोडावी लागेल आणि त्याबदल्यात आपल्याला पेनल्टीही भरावी लागेल. अनेक बॅंका तर मुदत ठेवी रक्कमेच्या एक टक्‍क्‍यांपर्यतच पेनल्टी वसूल करतात. अशावेळी मुदत ठेवीतून मिळणारा फायदा हा असून नसल्यासारखा असतो. या स्थितीतून वाचण्यासाठी बॅंकेने एफएफडी सुविधा सुरू केली आहे. बॅंकेत बचत खाते सुरू करणाऱ्या खातेदारांना ही सुविधा दिली जाते. या सुविधाच्या नियमानुसार बचत खातेधारकांच्या खातेमध्ये एक निश्‍चित रक्कमेपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल तर ती रक्कम आपोआप एफएफडीच्या खात्यात ट्रान्सफर होते. त्याचा फायदा म्हणजे बचत खात्यातून आपल्याला केवळ 3.5 पासून 4 टक्‍क्‍यापर्यंतचे व्याजदर मिळते. तर एफएफडीच्या खात्यात ही रक्कम गेल्यानंतर त्या रक्कमेवर मुदत ठेवीच्या व्याजदराप्रमाणे व्याज आकारले जाते. उदा. श्रीनिवासनचे बचत खाते असून त्या खात्यावर बॅंकेने एफएफडीची सुविधा प्रदान केलेली आहे. त्याची मर्यादा 50 हजार रुपयापेक्षा अधिक आहे. श्रीनिवासनच्या बॅंक खात्यात जर 50 हजार रुपये राहत असतील तर बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे त्याला व्याज मिळेल. मात्र त्याच्या खात्यात जर एक लाख रुपये असतील तर 50 हजारांची रक्कम आपोआप एफएफडी खात्यात ट्रान्सफर होईल आणि त्यावर एफडीच्या हिशोबाने व्याज मिळेल.

लॉक इन पिरियड नाही
एफएफडी सुविधा असणाऱ्या खात्यावर सामान्य मुदत ठेवीप्रमाणे लॉक इन पिरियड नसतो. म्हणजेच रक्कम काढल्यानंतर कोणतीही पेनल्टी आकारली जात नाही. एफएफडीच्या सुविधेनुसार खातेधारक हा कितीही रक्कम खात्यातून काढू शकतो. मग त्याची थोडीफार रक्कम एफएफडीमध्ये ट्रान्सफर झालेली का असेना. एफएफडीमध्ये असलेल्या रक्कमेवर व्याज दिले जाते. मग ती रक्कम दहा हजार असो किंवा एक लाख असो. त्याचा फायदा कालावधीनुसार खातेधारकाला मिळत जातो. ही रक्कम आपत्कालिन फंडसाठी देखील उपयुक्त ठरते. कालांतराने दरमहा दहा ते वीस हजार रुपये बाजूला पडत गेले तर वर्षाकाठी आपण एक-दीड लाखाचा निधी जमा करू शकतो आणि त्यावर सात टक्‍क्‍याच्या आसपास व्याजही मिळेल. तसेच आपत्कालिन स्थितीत पैसे काढल्यास पेनल्टी देखील बसणार नाही.

– अनिल विद्याधर

Leave A Reply

Your email address will not be published.