मुंबई: राज्यातील सत्तानाट्यात महाराष्ट्र विकास आघाडीने बाजी मारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात हा महाविकास घडीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात आज दाखल करण्यात आली आहे.
स्थगिती देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
Bombay High Court refuses
to take up urgent hearing on petition seeking stay on the swearing-in of Uddhav Thackeray
as chief minister of Maharashtra— Press Trust of India (@PTI_News) November 28, 2019
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला स्थिगिती देण्यात यावी अशी याचिका काही वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.