आपले तोंड हे वरून सुंदर दिसले तरी दाताची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. चेहरा हा माणसाचा आरसा आहे. भावनांचा गोंधळ चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
मौखिक आरोग्य चांगले नसल्यास दाताचे, हिरड्यांचे विकार उद्भवतात. दात स्वच्छ न ठेवल्यास त्या ठिकाणी आम्ल तयार होते व दात किडतात.
या कारणामुळे 80 टक्के लोकांचे दात किडलेले असतात. काहीवेळा त्यामुळे दाटला छिद्रे पडतात. ही छिद्रे भरली नाहीत तर दात लवकर पडतो आणि तो दुखायला लागतो. तेथील रक्तवाहिन्या तुटतात. तेथून रक्त व पू येतो. अशावेळी हिरड्यांचा आधार असलेले हाड घासले जाते.