मुंबई –मराठी चित्रपटमध्ये मागच्या वर्षी गाजलेला चित्रपट म्हणजे नाळ या चित्रपटातील सर्वात लोक प्रिय झालेला बाळ कलाकार श्रीनिवास पोकळे याला या चित्रपटातील आपल्या भूमिकेने सिनेप्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान मिळविले आहे. या चित्रपटातील ‘जाऊ दे नवं’ या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता सध्या तो कुठे आहे आहे हा प्रश्न नक्कीच पडला असेल..
दरम्यान, श्रीनिवास पोकळे हा मूळचा अमरावतीचा असून तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे. नाळ हा चित्रपट मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटातील आठवणी श्रीनिवासने एका वृत्त वाहिनीशी शेअर केल्या आहे, त्याने सांगितले,’नाळ चित्रपटाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. शूटिंगसाठी आम्हाला सहा वाजता उठायला लागायचे. नदीच्या पाण्यात शूटिंग होते. ऐन थंडीत पाण्यात उतरावे लागायचे. नाळमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची मला आता खूप आठवण येते.’
View this post on Instagram
Hello there #zeestudiosmarathi ,#nagrajmanjule ,#nationalfilmawards2019 ,#chaitya ,#shripokale
नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासने राजकुमार आणि सुधाकर रेड्डी जॉर्ज रेड्डी नावाचा एक तेलुगु चित्रपट केला आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यात त्याने मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्याने तेलुगु भाषेचे धडेदेखील गिरविले.