What is beef tallow? । देशात गोमांसबाबतचा वाद हा खूप जुना आहे. पण यावेळी प्रकरण जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराबाबतचे आहे. सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने दावा केला की, गुजरातस्थित पशुधन प्रयोगशाळेने भेसळीची पुष्टी केली आहे. टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला, ज्याने दिलेल्या तुपाच्या नमुन्यात “बीफ टॅलो” असल्याची पुष्टी केली. आता हे नेमकं बीफ टॅलो म्हणजे काय ? हे सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. नेमका याचा वापर कशासाठी केला जातो ? आणि प्रसादात याचा वापर का करण्यात आला असेल याविषयीची माहिती जाणून घेऊ…
काय प्रकरण आहे ? What is beef tallow? ।
“बीफ टॉलो” म्हणजे काय आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे? प्रथम प्रकरण काय आहे ते समजून घेऊ. जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराबाबतचा दावा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान,आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वायएस शर्मिला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले कि, हे तिरुमलाच्या पावित्र्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठी हानिकारक आहे. त्याचवेळी कोट्यवधी हिंदूंचे पूजनीय देव व्यंकटेश यांची बदनामी झाली आहे. आम्ही सीएम चंद्राबाबू नायडू यांच्याकडे मागणी करतो की तुमच्या आरोपांमध्ये कोणतेही राजकीय परिमाण नसेल, भावनांचे राजकारण करण्याचा तुमचा हेतू नसेल, तर तुम्ही ताबडतोब उच्चस्तरीय समिती स्थापन करा किंवा सीबीआयकडून तपास करा,”अशी मागणी त्यांनी केली.
बीफ टॉलो म्हणजे काय? What is beef tallow? ।
बीफ टॉलो म्हणजे काय? याविषयी जाणून घेऊ… बीफ टॅलो हे मुळात बीफ फॅटपासून बनवले जाते. त्यामध्ये रंप रोस्ट, रिब्स आणि स्टीक यांसारख्या गोमांसाच्या तुकड्यांमधून निघालेली चरबी असते. हे मांसापासून काढलेली शुद्ध चरबी वितळवून देखील बनवता येते, जे थंड झाल्यावर लवचिक पदार्थात बदलते. खोलीच्या तपमानावर ते मऊ लोणीसारखे दिसते.”
मंदिराचा प्रसाद
तिरुपती मंदिरात लाडूंचा प्रसाद तयार केला जातो. याठिकाणी दररोज 3 लाख लाडू बनवून वाटले जातात. लाडूंमध्ये गोमांस चरबी, प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल मिसळले जाते. ज्या तुपात लाडू तयार केले जातात त्यात हे सर्व आढळते. एवढेच नाही तर हे लाडू केवळ प्रसाद म्हणून भक्तांना वाटलेच नाहीत तर हे लाडू प्रसाद म्हणून देवालाही अर्पण केले आहेत.
मंदिरात तूप कुठून येते?
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सहकारी दूध महासंघ गेल्या 50 वर्षांपासून मंदिर समितीला शुद्ध देशी तूप सवलतीच्या दरात पुरवत होता. जुलै 2023 मध्ये, कंपनीने कमी दराने पुरवठा करण्यास नकार दिला, त्यानंतर तत्कालीन जगन मोहन रेड्डी सरकारने 5 कंपन्यांना तूप पुरवण्याची जबाबदारी दिली होती. या वर्षी जुलैमध्ये, नमुन्यांमध्ये अनियमितता आढळल्यानंतर, नायडू सरकार सतर्क झाले आणि 29 ऑगस्ट रोजी पुन्हा केएमएफकडे पुरवठ्याचे काम सोपवले. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
अमित शाह नक्षलवाद्यांना म्हणाले,’शस्त्रे टाका नाहीतर ऑपरेशन ऑलआउट सुरू करू…’