मुंबई – विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्क्यांनी विजय मिळवला आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. यंदा भापच्या वाट्याला १०५ जागा तर शिवसेनेच्या वाट्याला ५६ जागा आल्या आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार यात काहीही शंका नाही. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी देखील मोठी मुसंडी मारली असून, शिवसेनेचा पुढचा पर्याय काय असू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, याच स्थितीवरचं समर्पक असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्रात शिवसेनेचा वाघ ऐटीत बसला आहे. त्याच्या गळ्यात घड्याळ तर हातात कमळाचं फूल दाखण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेची पुढची भूमिका काय असू शकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
व्यंग चित्रकाराची कमाल!
बुरा न मानो दिवाली है.. pic.twitter.com/krj2QAnGmB— Sanjay Raut (@rautsanjay61) October 25, 2019