मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. यावेळी मनसेच्या महाअधिवेशनात दुपारच्या सत्रात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिरूप मंत्रिमंडळाची रूपरेखा, प्रास्ताविक आणि आचारसंहिता मांडली.
या संकल्पनेव्दारे राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेता आणि सरचिटणीस यांना संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. सत्तेतील मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा मनसे नेते पाठपुरावा करतील. हे सर्व नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्र्यांचा अहवाल देतील. मात्र
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते. सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात.