रिव्हर्स मॉर्गेज कर्ज म्हणजे काय? (भाग-२)

रिव्हर्स मॉर्गेज कर्ज म्हणजे काय? (भाग-१)

रिव्हर्स मॉर्गेजची लोकप्रियता का नाही
भारतात घराकडे प्राथमिक संपदा म्हणून पाहिले जाते आणि ही संपदा पिढ्यान्‌पिढी सांभाळली जाते. जोपर्यंत मोठे कारण निर्माण होत नाही, तोपर्यंत घर विकले जात नाही किंवा कर्ज घेतले जात नाही.

दुसरे म्हणजे भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. त्यांची देखभाल, सांभाळ करणे हे पाल्याचे कर्तव्य मानले जाते. साधारणपणे ज्येष्ठांच्या नावावर ही मालमत्ता असते आणि त्यांना आपली गुजराण करण्यासाठी अतिरिक्त पैशाची गरज भासत नाही. कारण त्यांची मुले त्यांचा सांभाळ करत असतात.

तिसरे म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज हा एक कर्जाचा प्रकार म्हणून भारतीयांच्या पचनी पडलेला नाही. तसेच त्याबाबतची माहिती फार कमी जणांना आहे. बहुतांश नागरिकांना गृहकर्जाची माहिती आहे. परंतु रिव्हर्स मॉर्गेजबाबत अनाभिज्ञ आहेत. जोपर्यंत रिव्हर्स मॉर्गेजच्या कर्जाचा प्रसार होत नाही, प्रसिद्धी दिली जात नाही तोपर्यंत त्याची लोकप्रियता होण्याची शक्‍यता कमीच आहे.

कोणासाठी फायदेशीर
भारतात रिव्हर्स मॉर्गेज कर्ज ज्येष्ठांसाठी फायदेशीर ठरू शकते. घर असताना उत्पन्नाचा स्रोत नसेल किंवा अचानक थांबला असेल तर अशा मंडळींसाठी रिव्हर्स मॉर्गेज कर्ज फायद्याचे ठरू शकते. अचानक पैशाची गरज भासल्यास तात्पुरती सोय म्हणून या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. रिव्हर्स मॉर्गेज प्रकारात घरावर एक रक्कम निश्‍चित केली जाते आणि ती दिली जाते. याशिवाय ती रक्कम फेडल्यास त्या घरावर पुन्हा मालकी हक्क प्रस्थापित होतो. निश्‍चित कालावधीत कर्जफेड केल्यास मालमत्तेवर पुन्हा हक्क सिद्ध होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.