कस लागला… मिळालेले गुण कष्टाचे!

तालुक्‍याचा निकाल यंदा पाच टक्‍क्‍यांनी घसरला खेड तालुक्‍यात नऊ शाळा शंभर नंबरी
दहावी परीक्षेत उत्तीर्णांचे प्रमाण घटले : तोंडी परीक्षांचे गुण गुल

पुणे – राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचे निकाल आज जाहीर झाले. यावर्षीच्या निकालात मागील वर्षी पेक्षा कमालीची घट झाली आहे. दहावीच्या निकालात झालेल्या घसरणी मागील मुख्य कारण हे तोंडी परीक्षांचे गुणांचे सांगितले जात असून या वर्षी एकूण गुणांमध्ये या गुणांचा समावेश केलेला नसल्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांच्या अभ्यास व बुद्धिमत्तेचा कस लावणारी एसएससी बोर्डाची परीक्षा ठरली, असल्याचेही शैक्षणिक तज्ज्ञांचे मत आहे. यावर्षीच्या 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कृती पत्रिकेवर संपूर्ण परीक्षा अवलंबून होती; त्यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास त्यांची बुद्धीमत्ता व बुद्‌ध्यांक यातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वर्षभर प्राप्त केलेल्या ज्ञानातून लिहिलेली प्रत्यक्ष उत्तरे या वरच विद्यार्थ्यांचे गुण त्यांनी प्राप्त केलेले आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या कष्टाचे गुण आहे.

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील 77 शाळांपैकी 9 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. खेड तालुक्‍याचा शेकडा निकाल 86.17 टक्के इतका लागला मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 5 टक्‍के निकाल घसरला आहे. तालुक्‍याती 77 शाळांमध्ये सर्वांत कमी निकाल चिंबळी येथील श्री सरस्वती विद्यालयाचा 37. 50 टक्‍के लागला आहे. यावर्षी नऊ विद्यालये वगळता सर्वच विद्यालयातील निकालाची टक्‍केवारी घसरली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्‍यातील 6 हजार 393 पैकी 5 हजार 509 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 1 हजार 199 विद्यार्थ्यांनी विशेष गुणावत्ता, 1 हजार 929 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 1 हजार 791 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 590 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून तब्बल 884 विद्यार्थी अनउत्तीर्णी झाले आहेत.

खेड तालुक्‍यातील शाळा निहाय निकाल (टक्‍के) पुढीलप्रमाणे ; महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर (91.66), श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय, आळंदी देवाची (91.89), श्री शिवाजी विद्या मंदिर, चाकण (88.18), एम. वाय. होळकर विद्यालय, वाफगाव (88.52), कर्मवीर विद्यालय वाडा (85.71), रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस (88.88), जवाहर विद्यालय, चास (90.51), श्री सिद्धेश्‍वर विद्यालय, वेताळे (80), एस. एम. एफ. गायकवाड विद्यालय, दावडी (89.71), श्री शिवाजी विद्यालय, शेलपिंपळगाव (87.15), सुभाष विद्यालय, बहुळ (80.64), कुंडेश्‍वर विद्यालय, पाईट (80.61), हुतात्मा राजगुरू विद्यालय, राजगुरूनगर (71.02), अंबिका विद्यालय, कनेरसर (59.45), शिवाजी विद्यालय, डेहणे (72.97), राष्ट्रीय विद्यालय, कुरकुंडी (93.75), सुमंत विद्यालय, पिंपरी बुद्रुक (74.64), भाऊसाहेब राऊत विद्यालय, घोटवडी (93.54), नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ (89.80), श्रीपती महाराज माध्यमिक विद्यालय, म्हाळुंगे इंगळे (68.28), शासकीय आश्रम शाळा, कोहिंडे बुद्रुक (90.62), श्री शिंगेश्‍वर विद्यालय, कुडे बुद्रुक (96.55), न्यू इंग्लिश स्कूल, काळूस (88.42), मामासाहेब मोहोळ प्रशाला, वाशेरे (82.85), शासकीय आश्रम शाळा टोकावडे (67.50), भैरवनाथ विद्यालय, दोंदे (91.15), कै. डी. जी. टाकळकर विद्यालय, टाकळकरवाडी (90.47), मोहोळ माध्यमिक प्रशाला, पाळू (84.14), माध्यमिक विद्यालय पाडळी-काळेचीवाडी (91.37), श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद (97.43), भैरवनाथ विद्यालय, वाकी (98.73), श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय, भांबोली (97.39), साने गुरुजी विद्यालय, खरपुडी बुद्रुक (79.48), श्री भानोबा विद्यालय, कोयाळी (86.64), नुतन विद्यालय, रेटवडी (94.82), भैरवनाथ विद्यालय किवळे (65.51), वसंतराव मांजरे विद्यालय, मांजरेवाडी (89.18), ज्ञानदिप विद्यालय, शिवे (90.38), माध्यमिक विद्याल, सायगाव (88.88), नवमहाराष्ट्र विद्यालय, खराबवाडी (88.23), कन्या विद्यालय चाकण (85.07), संत मुक्‍ताबाई माध्यमिक विद्यालय, सोळू (71.41), एल. व्ही. दुराफे विद्यालय, आळंदी (56.36), मॉडर्न हायस्कूल भोसे (83.33 ), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी (86.86 ), इंग्लिश मीडियम स्कूल, राजगुरुनगर (99.26), आदर्श विद्यालय, आंबोली (98.41), भीमाशंकर माध्यमिक विद्यालय, आव्हाट (100), त्रिमूर्ती विद्यालय, तिन्हेवाडी (98.07), बाबूराव पवार विद्यालय, बिरदवडी (83.05), न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे, बुद्रुक (89.65), मळूदेवी माध्यमिक विद्यालय, वाळद (57.57), भैरवनाथ विद्यालय, करंजविहिरे (65.51), राजे शिवछत्रपति माध्यमिक विद्यालय, आळंदी देवाची (56.75), आदर्श विद्यालय, शिरोली (52.63), कै. बी. जी. पी. पाटील विद्यालय, गुळाणी (87.09), हनुमंत माध्यमिक विद्यालय, चिंचोशी (95.12), सीएसपी मंडळाचे राजे शिवछत्रपति माध्यमिक विद्यालय, चांदूस (57.14), पायस मेमोरीयल स्कूल, वाकी खुर्द (97.91), विद्यानिकेतन सोसायटी खेड (95.34), आर्यन स्कूल चांडोली (95.23), राजमाता जिजाऊ कन्याशाळा, तुकाईवाडी (96.07), शासकीय आश्रम शाळा, चिखलगाव (96), ज्ञानवर्धिनी विद्यालय, आंबेठाण- चाकण (93.33), चौधरी पाटील इंग्लिश मीडियम, खरपुडी बुद्रुक (97.77), आनंद इंग्लिश मीडियम, कुरुळी (82.35), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी फाटा (80.95), भामा इंग्लिश मीडियम स्कूल (92.85).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.