मुंबई – भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात गेल्या काही महिन्यापूर्वी आरोप प्रत्यारोप झालेले दिसले, ‘उर्फीवरची टीका हा राजकारणाचा विषय नाही, तसेच स्वैराचाराच्या नावावर डोळे बंद करून बसणार नसल्याच्या’ शब्दात चित्रा वाघ यांनी उर्फीला फटकारले होते. उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता.
या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदा सरवणकर यांना दादरमध्ये गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या क्लीनचीटबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना खोचक टोला लगावला आहे.“काय झालं उर्फी जावेदचं? ती पण भाजपात गेली काय? तिच्या कपड्यांबद्दल आता कोणीच काही बोलत नाहीये”. अस म्हणत वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे,
ते पुढे म्हणाले, ” यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकरांना क्लीन चीट मिळाली, यात काही विशेष नाही. ते भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे”. असंही ते म्हणाले आहे.