“जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है”

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  दिवसांपूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नद्यांमध्ये नागरिकांचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर  हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेने बोलवलं असं म्हटलं होतं. यावरून आता सध्या परिस्थितीचं उदाहरण देत काँग्रेसने टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब” असल्याचं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो” असं म्हणत जोरदार टीका केली आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.