Narendra Modi swearing in ceremony । PM Modi New Cabinet : सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 72 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्व मित्रपक्षांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी, तरीही काही पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. कारण एनडीएच्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा आहेत, परंतु सध्या 9 पक्षांचे केवळ 11 नेते मंत्री झाले आहेत, तर 5 पक्षांच्या नेत्यांना मोदी 3.0 मध्ये स्थान मिळालेले नाही.
मात्र या सोहळ्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शपधविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनामध्ये बिबट्या फिरत असलेला पाहायला मिळाला. राष्ट्रपती भवन परिसरात सुरू असलेल्या शपधविधीवेळी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यावर इतर मंत्री शपथ घेत होते. मंत्री दुर्गादास उईके हे शपध घेतल्यावर स्वाक्षरी करत होते.
An animal was seen strolling back in the Rashtrapati Bhavan after MP Durga Das finished the paperwork
~ Some say it was a LEOPARD while others call it some pet animal. Have a look 🐆 pic.twitter.com/owu3ZXacU3
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) June 10, 2024
यादरम्यान त्यांच्या पाठीमागून सीसीटीव्ही एक बिबट्या मागून चाललेला दिसत आहे. 12 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमधील प्राणी नेमका कोणता हे अद्याप काही समोर आलेलं नाही.
मात्र तो बिबट्या असल्याचं बोललं जात आहे. प्राण्याच्या आकारावरून तो प्राणी बिबट्या आहे अशी चर्चा सगळीकडे होत आहे. पण जर खरोखरच तो प्राणी बिबट्या असेल तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा चिंतेचा विषय आहे.