‘स्ट्रीमिंग’ म्हणजे नक्की काय?

सद्या अनेक चित्रपटांचे अथवा वेबसिरीजचे ट्रेलर टीव्हीवर पाहायला मिळतात. ट्रेलर संपल्यावर ‘स्ट्रीमिंग ऑन…’ अशा आशयाचे एक वाक्यही आपण पाहतो. ‘स्ट्रीमिंग म्हणजे नक्की काय? हा प्रश्न आपल्याला पडत असेल तर आज आम्ही त्याचे उत्तर देत आहोत.

स्ट्रीमिंग एक टेक्नॉलॉजी असून या टेक्नॉलॉजीच्या मदतीने कोणत्याही व्हिडीओ वा ऑडिओला थेट आपल्या डिव्हाईसमध्ये चालवू शकता. यासाठी कोणत्याही मल्टीमीडिया फाईलला आपल्या डिव्हाईसडाऊनलोडमध्ये डाउनलोड करण्याची गरज पडत नाही. स्ट्रीमिंगच्या माध्यमातून युजर्स स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाईसवर व्हिडीओ पाहू शकतात. ऑडिओ ऐकू शकतात. स्ट्रीमिंग कंटेंटमध्ये व्हिडीओ, टीव्ही शो, सिनेमा, पॉडकास्ट आदींचा समावेश असतो. तुम्ही तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन आदी डिव्हाईसवर स्ट्रीमिंग करू शकता. याशिवाय स्ट्रीमिंगद्वारे व्हिडीओ कॉलही करता येतो.

स्ट्रीमिंग टेक्नॉलॉजीत व्हिडीओ आणि ऑडिओ फाईल डिव्हाईसमध्ये सतत सुरू राहते. स्ट्रीमिंगच्या माध्यमातून व्हिडीओ किंवा ऑडिओ कोणत्याही डिव्हाईसवर इंटरनेटच्या माध्यमातून येते आणि याला रिअल टाईममध्ये प्ले करता येते. याशिवाय स्ट्रीमिंगमध्ये मीडिया फाईल प्ले करण्यासोबतच डिलीट ही केले जाऊ शकते. स्ट्रीमिंगचा उपयोग करण्यासाठी मात्र स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज असते. याशिवाय तुम्ही ज्या ऍप किंवा प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग पाहू इच्छिता, ते तुमच्या डिव्हाईसमध्ये असणे गरजेचे आहे.

काय असते ‘लाईव्ह स्ट्रीम’?
लाईव्ह स्ट्रीमिंग टेक्नॉलॉजीत तुम्ही कोणताही व्हिडीओ थेट प्रसारित करू शकता.
रेकॉरडेड व्हिडीओ स्ट्रीम करण्याच्या पद्धतीपेक्षा ही टेक्नॉलॉजी थोडी वेगळ्या पद्धतीने वापरली जाते. इथे व्हिडीओ एडिटिंगशिवाय थेट लाईव्ह होतो. सध्या बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा लाईव्ह येण्याची सुविधा दिली जाते. सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑन डिमांड टीव्ही शो, सिनेमा, ओरिजनल शो, लाईव्ह टीव्ही आदींना स्ट्रीमिंग कंटेंट देतात. यालाच ‘स्ट्रीमिंग सर्व्हिस’ म्हटले जाते. ही सर्व्हिस स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या वेगवेगळ्या डिव्हाईससाठी उपलब्ध असते. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ सारखे विविध प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग सर्व्हिस सबस्क्रिप्शनवर आपली सुविधा देतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.