बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानची कन्या इरा खान ही सध्या तिचा बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. इराची सोशल मीडियावरील अकौंटस् सदोदित या दोघांच्या फोटोंनी भरलेली असतात.
सोशल मीडियावर खुलेपणाने मिशालसोबतच्या रिलेशनची चर्चा करणारी इरा माध्यमांपुढे मात्र त्याच्याशी असलेले नाते नाकारताना दिसते. अलीकडेच इराला जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, असं काहीही नाही.
मी सोशल मीडियावरही आमच्या नातेसंबंधांबाबत काही पोस्ट करत नाही. जे मला वाटतं तेच पोस्ट करते. यामागे माझे अकौंट ऍक्टिव ठेवणे एवढाच हेतू असतो.
रिलेशनशिपबाबत जगाला दाखवण्यासाठी इराचे विचार एकदम भन्नाट आहेत. ती म्हणते, “रिलेशनशिप ही गोष्ट माणूस म्हणून तुम्ही कसे आहात यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला खुलेपणाने याविषयी बोलावेसे वाटत असेल तर तुम्ही जरूर बोलावे.
पण तसे वाटत नसेल तर तुम्ही उगाचच खुलेपणा दाखवण्याची गरज नाही. माझ्याबाबत म्हणाल तर मी काहीही लपवण्याचा प्रयत्न करत नाहीये.’ वास्तविक, इराला सर्व काही सांगायचंही आहे आणि लपवायचंही आहे. तेव्हा इरा मॅडम एकदा शांतपणाने विचार करून काय ते ठरवा!फ