मुंबई – माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला “ऐस्लाडोस’ सिरिजद्वारे आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात केली आहे. ही सिरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. या सिरिजमधून ती केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे प्रतिनिधित्व करणे तिच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे तिचे मत आहे. या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होती यातच पुन्हा एकदा लग्नाच्या फोटोवरून सोशल मीडियावर ती चर्चेत अली आहे.
दरम्यान सोशल मीडियावरील तिच्या फोटोवरून युजर्स तिच्या लग्न झाल्याचा चर्चा करत आहे मात्र, हा फोटो ‘वर्जिन भानुप्रिया’ नावाची एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजमधील एक सीनचा हा फोटो आहे. हा फोटो गौतम गुलाटीने शेअर केला असून आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला होता. “तुम्ही आम्हाला शुभेच्छा देणार नाही का?” अस देखील या लिहिले आहे .