मुंबई – बॉलिवुडमधील आगामी “थलाइवी’ या चित्रपटातील अभिनेत्री कंगणा रणावतचा पहिला लुक टीजर आणि पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात जयललिताच्या भूमिकेत कंगणा झळकणार आहे.
या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगणा कठोर परिश्रम घेत असून चित्रपटाच्या टीझरमधून त्याची झलक दिसून येत आहे. हा टिझर पाहिला असता जयललिताच्या भूमिकेत कंगणा असल्याचे कोणीही ओळखू शकत नाही. यावरूनच या भूमिकेसाठी कंगणाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येते.
अलीकडेच तिने ‘थलायवी’चे एक शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. याची माहिती कंगनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. शूटिंग पूर्ण केल्यानंतर कंगना तिच्या हिमाचलच्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर आता कंगनाने एक ट्विट करत सांगितले की. ‘थलायवी’साठी तिने 20 किलो वजन वाढवले होते.आता ती ते कमी करतेय.
I had gained 20kgs for Thalaivi, now that we are very close to completing it, need to go back to my earlier size, agility, metabolism and flexibility. Waking up early and going for a jog/walk …. who all are with me ? 🙂 pic.twitter.com/4HP6jSRGq5
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 14, 2020
कंगानाने ट्विटरवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यात ती स्लिम दिसतेय. या फोटोला कॅप्शन देताना कंगानाने लिहिलेय, थलायवीसाठी मी 20 किलो वजन वाढवले होते. आता शूटिंग जवळपास पूर्ण होणार आहे. आता मला माझी आधीच लवकचिकता परत आणण्याची गरज आहे. सकाळी लवकर उठतेय आणि वॉक करायला जातेय. कोण-कोण माझ्यासोबत आहे ?’ कंगना वजन कमी करण्यासाठी योगा आणि वॉकचा आधार येतोय.
जयललिताची भूमिका साकारण्यासाठी कंगणाने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच तमिळ भाषाही अवगण करून घेतली आहे. याशिवाय जयललिताच्या लुकसाठी कंगणाने तासन्तास प्रोस्थेटिक सेशनही केले आहे. आता चित्रपटाचा फर्स्ट लुक पाहता तिची मेहनत यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, “थलाइवी’ चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यात कंगणाशिवाय साउथचा स्टार अरविंद स्वामीही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. जो एमजीआरची भूमिका साकारत आहे. तसेच प्रकाश राज हे करुणानिधीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.