काय म्हणताय? ‘पब्जी’ चे भारतात पुनरागमन होणार?

पुणे – आपणही पब्जी मोबाइल गेमचे चाहते आहात आणि गेमवरील बंदीमुळे दु:खी असल्यास, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. एअरटेल आणि पब्जी मोबाइलमध्ये वाटाघाटी सुरू असल्याचे वृत्त आहे. जर चर्चा यशस्वी झाल्या तर पब्जी मोबाइल गेम लवकरच भारतीय बाजारात पुनरागमन करू शकेल.

इंग्रजी टेक वेबसाइट एन्ट्रॅकरच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, रिलायन्स जिओशी बोलणी अयशस्वी झाल्यावर पब्जी कॉर्पोरेशन आता एअरटेलशी चर्चा करीत आहे. एअरटेल आणि पब्जीची ही कथित चर्चा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. अर्थात, या अहवालावर पीयूबीजी आणि एअरटेलकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही.

सेन्सर टॉवरच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार पब्जी डाउनलोड करण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये पब्जीचे जागतिक डाउनलोड 14.6 दशलक्ष होते जे 26.7 टक्क्यांनी घसरून 10.7 दशलक्षांवर गेले.

गेल्या महिन्यात आणखी एका अहवालात म्हटले आहे की, पब्जी आणि रिलायन्स जिओ यांच्यात पब्जी भारतात परतण्याबाबत चर्चा आहे. या अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की दोन्ही कंपन्यांच्या कायदेशीर टीमची भागीदारीबाबत चर्चा सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.