दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा त्याच्या द राजा साब या सिनेमाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, या सिनेमात अभिनय करण्यासाठी प्रभासने मोठी फी घेतली आहे. त्याने घेतलेल्या या सिनेमातील मानधनाबाबत मोठी चर्चा केली जात आहे. तसेच या सिनेमाच्या सेटवरील काही अॅक्सन सीन्स देखील व्हायरल झाले असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे, या व्हायरल व्हिडिओमध्ये मालविका दिसत आहे. हा व्हिडिओ या चित्रपटाच्या सेटवरचा असून मालविका अॅक्शन सीन करताना दिसत आहे. हा एक फाईट सिक्वेन्सचा सीन असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओत ग्रीन क्रोमाचा वापर करून शूट केल्याचे दिसत आहे. मालविका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सुरक्षेसाठी तिला दोरखंडं बांधलेले आहेत. मालविकाचे पात्र हवेत लाथ मारून समोरच्या व्यक्तीसोबत अॅक्शन करीत आहे. प्रभासच्या एका फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘द राजा साब’ सिनेमाच्या सेटवरून निधी अग्रवालचा एक फोटोही लीक झाला होता. मात्र, नंतर निर्मात्यांनी लीक झालेला फोटो हटवून टाकला. प्रभास पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर-कॉमेडी प्रकारात आपला अभिनय साकारताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या द राजा साब या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तब्बल १५० कोटींचे मानधन
गेल्या काही वर्षांमध्ये प्रभासने केवळ ॲक्शन सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रभासची कॉमेडी टाईमिंग्ज बघायची आहे. या सिनेमाचा बराचसा भाग शूट झाला असून प्रभासने राज साब साठी तब्बल १५० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. हा सिनेमा यापूर्वी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकल्यात आली आहे.
मेकर्सनी क्लल्श टाळली
केजीएफ फेम अभिनेता यश हा त्याच्या टॅाक्सिक सिनेमाला घेऊन प्रचंड उत्सुक आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासचा द राजा साब आणि यशचा टॅाक्सिट या दोन सिनेमांची क्लल्श होणार होती. पण द राजा साबच्या मेकर्सने ही क्लश न होऊ देता सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन केली आहे. द राजा साब या सिनेमाच्या रिलीजनंतर अभिनेता प्रभास हा संदिप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट सिनेमात दिसणार आहे. त्यानंतर दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या सल्लार दोन या सिनेमात दिसणार असल्याचे सांगितले जाते.