परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढविलेल्या कंपन्या काय सांगतात? (भाग-१)

मागील काही लेखांद्वारे आपण विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या संधींबाबत आढावा घेतला. आता जर आपण मागील २० वर्षांच्या तेजी-मंदीचा विचार केल्यास प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रांनी तेजीच्या लाटेचं पुढारपण केल्याचं आढळून येईल. नोव्हेंबर १९९८ ते फेब्रु. २००० च्या, या शतकातील पहिल्या तेजीचा विचार केल्यास माहिती तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या या तेजीत अग्रेसर ठरल्या होत्या. अशीही एक आख्यायिका त्यावेळी कानावर आली होती की एका अंतर्वस्त्र बनवणाऱ्या कंपनीनं नावातील साम्याचा फायदा उठवून त्या तेजीत लोकांना चांगलंच मूर्ख बनवलं होतं. त्यानंतर, साधारणपणे एप्रिल २००३ पासून जाने. २००८ पर्यंतच्या सर्वांत मोठ्या तेजीत रिअल्टी, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, फायनान्शिअल कंपन्या, ऊर्जा, टेलिकॉम इ. क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर होत्या तर माहिती तंत्रज्ञान, हेल्थकेअर व उपभोग्य क्षेत्रातील कंपन्या या पिछाडीवर राहिल्या. नंतरच्या जागतिक पडझडीनंतर सर्व वास्तव समोर आल्यावर सर्वच क्षेत्रांतील कंपन्या आकर्षक मूल्यात उपलब्ध होत्या, परंतु पुढील तेजीच्या लाटेची (मार्च २००९ ते नोव्हें. २०१०) मक्तेदारी मात्र धातू, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांकडं राहिली तर टेलिकॉम, उपयोगिता अथवा उपभोग्य क्षेत्रं या लाटेत काहीशी नरम राहिली होती.

तद्नंतर, डिसेंबर २०११ ते मार्च २०१५ या सत्ताबदलाच्या लाटेत आरोग्यक्षेत्र, आर्थिक ही दोन क्षेत्रं अग्रणी राहिली व धातू, उपयोगिता व टेलिकॉम ही क्षेत्रं मागे पडली. त्यानंतर जागतिक तेजीच्या वातावरणात व भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण बदलांत (नोटबंदी व जीएसटी) म्हणजे फेब्रु. २०१६ ते ऑगस्ट २०१८ च्या तेजीत पुन्हा धातू, औद्योगिक व आर्थिक ह्यां क्षेत्रांतील कंपन्यांनी उर्ध्व मार्गक्रमण केलं तर आरोग्य (हेल्थकेअर) व टेलिकॉम क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांची वाट लागल्यानं या क्षेत्रांस उतरती कळा लागली. आता प्रश्न हा आहे की पुढील मोठ्ठया तेजीचं सारथ्य कोणतं क्षेत्रं करणार ? मागील सलग चार लेखांतून मी आपणासमोर उपभोग्य, आर्थिक म्हणजेच बँकिंग, माध्यमं व करमणूक व रिअल इस्टेट / बांधकाम ही क्षेत्रं मांडलेलीच आहेत, तर पुढील क्षेत्राकडं जाण्याआधी परकीय गुंतवणूकदार ज्यांनी मागील तीन महिन्यांत आपल्या बाजारात खरेदीचा सपाटा लावलाय त्याबद्दल पाहू.

परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढविलेल्या कंपन्या काय सांगतात? (भाग-२)

मागील तीन महिन्यांत म्हणजेच सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये (जाने, फेब्रु, मार्च) परकीय गुंतवणूकदार संस्थांनी एकूण ४६,०६३.६७ कोटी रुपयांची खरेदी केलीय, त्यापैकी फक्त मार्च महिन्यातील आकडा आहे तब्बल ३२,३७१.४३ कोटी रुपये. आता कोणत्याही गुंतवणूकदाराला प्रश्न पडू शकतो की इतकी खरेदी नक्की कोणत्या कंपन्यांमध्ये म्हणजे त्यांच्या शेअर्समध्ये केली गेलीय! तर परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी एकूण ६१ कंपन्यांमध्ये आपला हिस्सा वाढवलेला आढळतो. खालील तक्त्यामध्ये अशा कंपन्यांची यादी दिलीय ज्यांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षात आपला हिस्सा वाढवत नेलाय. यांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे सोरील इन्फ्रा, ज्याची पालक कंपनी ही इंडियाबुल्स इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आहे. या कंपनीतील डिसेंबर २०१७ मध्ये अगदी नगण्य ०.१ % म्हणजे असणारा हिस्सा मागील वर्षाखेरीस १३२७० टक्क्यांनी वाढून १३.३७ टक्क्यांवर पोहोचलाय. त्यामुळं डिसेंबर २०१७ व २०१८ च्या तुलनेत सर्वांत जास्त तुलनात्मक टक्केवारी पाहता ह्या कंपनीचा अग्रक्रम राहतोय. खालील तक्त्याची मांडणी ही डिसेंबर २०१७ मधील परकीय गुंतवणूकीदारांचा त्या कंपनीमधील हिस्सा व डिसेंबर २०१८ च्या अखेरीस त्या कंपनीमध्ये असलेला हिस्सा, यांमधील टक्केवारीतील बदलानुसार उतरत्या क्रमानं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.